चौथ्या दिवसाचे प्रवचन

विपश्यनेचा अभ्यास कसा करावा ह्यावरील प्रश्न—कम्मा चे अधिनियम—मानसिक कार्याचे महत्व—मनाचे चार संग्रहः सजगता,बोध,संवेदना,प्रतिक्रिया—सजगता आणि समता ठेऊनच दुःखाच्या बाहेर पडण्याचा मार्ग आहे

चौथा दिवस पुष्कळच महत्वाचा दिवस आहे.आपल्या आंतरिक धम्म गंगे मध्ये डुबकी घेत असताना,शारीरिक संवेदने द्वारा स्वतःच्या सत्याबद्दल शोध घेणे सुरु केले. अज्ञानामुळे ह्या संवेदना भूतकाळामध्ये आपल्या दुःखाच्या वाढीस कारणीभूत होत्या,परंतू त्याच संवेदना आपल्या दु;खाचे निर्मूलन करण्याचे एक साधन सुध्दा होऊ शकतात. हे आपण शरीराच्या संवेदनेचे निरिक्षण करणे आणि त्याप्रति समता कशी ठेवायची हे शिकून मुक्तिच्या मार्गावर पहिले पाऊल ठेवले आहे.

विधी(तंत्र) बद्दल काही प्रश्न जे वारंवार विचारले जातातः

क्रमानेच शरीरावर ध्यान का केंद्रित केले जावे,आणि ह्या क्रमानेच का? कोणत्याही क्रमाचे पालन करावे,परंतु क्रम ठेवणे आवश्यक आहे.नाहीतर शरीराचे काही भाग सुटण्याचा धोका असतो,आणि ते भाग मुर्छित,रिक्त रहातील. संवेदना संपूर्ण शरीरभर होतच असतात,आणि ह्या तंत्रामुळे सर्व जागी त्याचा अनुभव घेण्याची क्षमता विकसित करणे हे महत्वपूर्ण आहे.ह्याच उद्देशामुळे क्रमवार पुढे जात रहाणे पुष्कळच उपयोगी आहे.

जर शरीराच्या कोणत्याही भागात संवेदना जाणवली नाही तर तेथे एक मिनिट भर थांबा. खरेतर तेथे जशा शरीराच्या कणा कणात संवेदना आहेत तशाच आहेत, परंतू त्या एवढ्या सूक्ष्म असतात की आपल्या मनाच्या सचेततेला त्या जाणवत नाहीत, आणि म्हणुनच तो भाग मूर्छित वाटतो. एक मिनिटभर शांतपणे अवलोकन करा, स्वस्थ आणि समतेने तेथे थांबा. संवेदनेची आसक्ति किंवा संवेदना नसल्याचा द्वेष करु नका. जर आपण असे केलेत तर, आपण आपल्या मनाची संतुलता घालवून बसाल, आणि असंतुलित मन पुष्कळच सुस्त होते; म्हणून ते निश्चितच अधिक सूक्ष्म संवेदनेचा अनुभव करु शकत नाही. परंतू जर मन संतुलित असेल तर ते तीक्ष्ण व अधिक संवेदनशील होते व सूक्ष्म संवेदनेचा शोध घेण्यास सक्षम होते. एक मिनिटभर त्या भागाचे समतेने निरिक्षण करा,पण त्यापेक्षा जास्त नाही. एका मिनिटामध्ये जर कोणतीही संवेदना जाणवली नाही तर मंदहास्य करुन पुढे जा. पूढल्या वेळेस पुन्हा मिनिटभर थांबा, लवकरच किंवा नंतर आपल्यास तेथे आणि पूर्ण शरीरभर संवेदनेचा अनुभव येण्यास सुरुवात होईल. आपण एक मिनिटभर थांबा व आतासुध्दा संवेदना जाणवली नाही तर जर आपण बंदिस्त जागेत असाल तर कपड्याचा स्पर्श जाणण्याचा प्रयत्न करा, जर खुल्या जागेत असाल तर वातावरणाचा स्पर्श पहा. ह्या बाह्य संवेदनेने काम सुरु करा व हळू हळू आपल्यास दुसऱ्या भागांतील संवेदना चांगल्या प्रकारे जाणवण्यास सुरुवात होईल.

जेव्हा शरीराच्या एका भागावर ध्यान केंद्रीत आहे आणि संवेदना दुसऱ्या जागी उत्पन्न झाली तर ही संवेदना अवलोकण्यासाठी क्रम सोडून पुढे किंवा मागे जावे का? नाही; क्रमानेच पुढे जा. शरीराच्या दुसऱ्या भागांतील संवेदना थांबविण्याचा प्रयत्न देखील करु नका – आपण सुध्दा असे करु शकणार नाही – परंतू त्याना महत्व देखील देऊ नका. प्रत्येक संवेदनेचे जेव्हा त्या स्थानावर क्रमाने याल केवळ त्याच वेळेस निरिक्षण करा, नाही तर आपण एक स्थानापासून दुसरीकडे शरीराचे अन्य काही भाग सोडत,केवळ स्थूल संवेदनेचे अवलोकन करीत उडी मारत रहाल. शरीराच्या प्रत्येक भागातील स्थूल किंवा सूक्ष्म,सुखद किंवा दुखद,स्पष्ट किंवा अस्पष्ट संवेदनेचे निरिक्षण करण्यासाठी आपल्यास प्रशिक्षित व्हायला पाहिजे. म्हणुनच ध्यान करण्यासाठी एका जागेकडून दुसऱ्या जागेवर उडी मारण्यास अनुमती देऊ नका.

  1. डोक्यापासून पायापर्यंत ध्यानाची यात्रा करण्यासाठी एकाद्यास किती वेळ लागू शकतो? हे कोणत्या परिस्थितीला कुणाला तोंड द्यावे लागते त्यावर अवलंबून आहे. एका निश्चित जागेवर आपल्यास ध्यान ठेवण्याचे आदेश आहेत,आणि तेथे आपल्यास संवेदना जाणवली की आपण लगेच पुढे चला. जर मन तीक्ष्ण असेल तर आपले ध्यान त्या जागी जाता क्षणीच आपल्यास संवेदना जाणवतील,आणि आपण लगेच पुढे जाऊ शकाल.जर ही स्थिती पूर्ण शरीरभर होत असेल तर दहा मिनिटामध्येच डोक्यापासून पायापर्यंत यात्रा करणे संभवनीय आहे, परंतू ह्या घटकेस अधिक जलदरित्या यात्रा करणे उचित नाही. तरीसुध्दा,जर मन सुस्त असेल,तर संवेदना प्रकट होण्यासाठी एक मिनिटभर प्रतिक्षा करण्याची आवश्यकता पडू शकते असे काही भाग असू शकतील. अशा परिस्थितीमध्ये, डोक्यापासून पायापर्यंतची यात्रा करण्यासाठी तीस मिनिटे किंवा एक तास देखील लागू शकतो.एका फेरीसाठी किती वेळ लागतो हे महत्वाचे नाही. फक्त धीराने, निरंतरेने काम करीत राहा; आपण निश्चितच सफल व्हाल.

ध्यानासाठी किती मोठा भाग घेतला पाहिजे? शरीराचा दोन किंवा तीन इंच रुंदीचा भाग घ्यावा; त्यानंतर दोन किंवा तीन इंचाचा भाग घेऊन पुढे जावे,आणि नंतर पुढे पुढे जात रहा. जर मन सुस्त असेल तर मोठा भाग घ्यावा, उदाहरणार्थ पूर्ण चेहरा,किंवा पूर्ण उजवा बाहू घ्या,त्यानंतर हळू हळू ध्यानाचे क्षेत्र कमी कमी करण्याचा प्रयत्न करावा.शेवटी शरीराच्या प्रत्येक कणांतील संवेदना जाणण्यास आपण सक्षम होऊन जाल, परंतू सध्या दोन किंवा तीन इंचाचा भागच पुरेसा आहे.

काय एखाद्यास फक्त शरीराच्या वरील भागात किंवा आतील भागात सुध्दा संवेदना जाणवली पाहिजे? कधी कधी साधकास विपश्यना सुरु करताच आंतील संवेदना जाणवतात; कधी कधी सर्वांत आधी त्याला बाहेरच्या संवेदना जाणवतात. कोणत्याही प्रकारे असो पूर्णतः ठीकच आहे. संवेदना केवळ वरील भागावर जाणवत असतील तर जोपर्यंत आपणास शरीराच्या सर्व भागामध्ये वरच्या स्तरावरील संवेदना जाणवणार नाहीत तोपर्यंत त्यांचे पुन्हा पुन्हा निरिक्षण करा. सर्व भागावरील वरच्या स्तरावरील संवेदनेच्या अनुभवानंतर,आपण नंतर आंतपर्यंत भेदणे सुरु करावे. हळू हळू प्रत्येक जागी संवेदना जाणवण्याची आपल्या मनामध्ये क्षमता येईल, दोन्ही प्रकारे आंतील आणि बाहेरील, शारीरिक बांध्याच्या प्रत्येक भागावरील संवेदना जाणवतील. परंतू सुरु करण्यासाठी वरील स्तरावरील संवेदना प्रकारे पुरेशा आहेत.

हा मार्ग संवेदनेच्या क्षेत्राच्या माध्यमातून जे संवेदनेच्या अनुभवा पलिकडे आहे अशा सत्यापर्यंत हा मार्ग घेऊन जातो. जर आपण संवेदनेच्या मदतीने आपले मन शुध्द करत रहाल तर, निश्चितच आपण अंतिम मुक्कामाला पोहोचाल.

जेव्हा आपण अज्ञानी असतो,तेव्हा संवेदना आपल्या दुःखाच्या वाढीस कारण बनून जाते, कारण की त्या संवेदने प्रति आसक्ति किंवा द्वेषाची प्रतिक्रिया करीत असतो. वास्तविक समस्या उद्भवतात,तणाव उत्पन्न होतो तो शारिरीक संवेदनेच्या स्तरावर असतो;म्हणूनच ह्या समस्येचा सोडवणुकी साठी,व मनाच्या सवयीची तऱ्हा बदलण्यासाठी ह्या स्तरावर काम करायला पाहिजे. कोणत्याही प्रतिक्रियेशिवाय,त्याच्या बदलणाऱ्या व अव्यक्तिगत स्वभावाचा स्विकार करीत, वेगवेगळ्या संवेदने बद्दल सजगता शिकली पाहिजे. असे करुन, आपण आंधळी प्रतिक्रिया देण्याच्या संवयीतून बाहेर पडतो,आणि आपण आपल्या दुःखापासून मुक्ति मिळवितो.

What is a sensation? संवेदना म्हणजे काय?- कुणालाही शारीरिक स्तरावर जे काही जाणवते त्याला संवेदना म्हटले जाते--- कोणतीही नैसर्गिक, सामान्य, साधारण शारीरिक संवेदना होते, ती सुखद किंवा दुःखद असो, स्थूल किंवा सूक्ष्म असो, तीव्र किंवा दुर्बळ असो. कधीही संवेदना, ही वातावरणामुळे उत्पन्न झाली आहे,किंवा पुष्कळ वेळ बसण्यामुळे, किंवा जुनाट रोगामुळे उत्पन्न झाली आहे ह्या आधारावरील सर्व कारणामुळे त्याची उपेक्षा करु नका. कोणतेही कारण असो, तथ्य हे आहे की आपल्यास संवेदनेची जाणीव होत आहे. ह्याआधी आपण अप्रिय संवेदनेला दूर करीत,सुखद संवेदना हव्याशा वाटत होत्या. आता आपण संवेदनेच्या मूल्यमापना शिवाय फक्त वस्तुनिष्ठ निरिक्षण केले.

हे पसंती शिवाय केलेले निरिक्षण आहे.कधीही संवेदनेची निवड करण्याचा प्रयत्न करु नका; त्याऐवजी स्वाभाविकपणे जे उत्पन्न होत आहे त्याचा स्वीकार करा. जर आपण काही विशेष प्रकारच्या,काही असाधारण संवेदनेचा शोध घेऊ लागलात, तर आपण आपल्यासाठी अडचणी उत्पन्न करु,आणि ह्या मार्गावर आपण प्रगति करु शकणार नाही. हे तंत्रज्ञान काही खास अनुभव मिळावा म्हणून नाही, परंतू कोणत्याही संवेदनेस समतेने तोंड देता यावे हे आहे. भूतकाळामध्ये आपल्या शरीरावर अशाच संवेदना होत असत,परंतू आपल्यास त्याची जाणीव नव्हती,आणि आपण त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत होतो. आता आपण सजगता ठेवत त्यावर प्रतिक्रिया न करण्याचे,शारीरिक स्तरावर जे काही होत आहे त्याचा अनुभव घेणे आणि समता ठेवणे शिकत आहोत.

ह्या प्रकारे काम करीत रहिल्यास, हळू हळू निसर्गाचे सर्व नियम आपल्यास स्पष्ट होतील. धम्मचा अर्थ आहेःप्रकृति(निसर्ग), नियम,सत्य हा आहे. अनुभवात्मक स्तरावर सत्य समजण्यासाठी, आपल्यास शरीराच्या चौकटीत राहूनच शोध घ्यावा लागेल. हेच सर्व सिध्दार्थ गौतम यांनी बुध्द होण्यासाठी केले होते,आणि त्यांना हे स्पष्ट झाले,आणि त्यांनी जसे काम केले तसेच काम कुणीही केले तर त्यालाही हे स्पष्ट होऊन जाइल,की पुर्ण विश्वभर,शरीराच्या आंत व बाहेर सर्वच काही बदलत असते.कोणताही पदार्थ अंतीम नाही; सर्व काही उत्पन्न होणाऱ्या प्रक्रिये मध्ये गुंतलेले आहे-- bhava(भव).आणि एक वस्तुस्थिती स्पष्ट होइलःकाहीही अकस्मात होत नाही. कोणताही बदल होण्यास कारण असते व ते फळ देते,आणि तेच फळ पूढे बदल होण्यास कारण बनते,कारण आणि फळ ह्यांची एक अंतहीन श्रृंखला तयार होते. अणि आतादेखील आणखी एक नियम स्पष्ट होईलःजसे कारण आहे तसेच फळ आहे; जसे बीज आहे तसेच फळ असेल.

एकाच मातीमध्ये एकजण दोन बिया पेरतो,एक उसाचे आणि दुसरे कडूनिंबाचेneem --एक पुष्कळच कडू उष्णकटिबंधीय वृक्ष. उसाच्या बियापासून एक झाड तयार होते त्याची रेष न रेष गोड असते, कडुनिंबाच्या बी पासुन झाड होते त्याचा तंतू न तंतू कडवट असतो. का म्हणून प्रकृति एकावर इतकी दया आणि दुसऱ्यावर इतकी निष्ठूर का होते असे कुणीही विचारु शकेल. सत्य हे आहे की प्रकृति न आहे दयाळू नाही निष्ठूर; ती ठरलेल्या नियमानुसारच काम करते. प्रत्येक बीजाची गुणवत्ता प्रकट करण्यामध्ये प्रकृति केवळ मदत करते. कुणीही जर गोड गुणधर्माचे बी पेरले तर पीक सुध्दा गोडच असेल. जर कडवटपणाचे बी पेरले तर पीक सुध्दा कडवटपणाचेच असेल. जसे बी तसे फळ असेल;जसे काम होइल तसेच परिणाम मिळतील.

समस्या ही आहे की पैदाशीच्या वेळी एकादा पूष्कळच सतर्क असतो,गोड फळ प्राप्त करण्यास इच्छुक असतो,परंतू पेरण्याच्या मोसमांत बेपरवाई करतो,आणि कडवटीच्या झाडांचे बी पेरतो. कुणालाही जर गोड फळे हवी असतील तर योग्य बीया पेरल्या पाहिजेत. प्रार्थना किंवा एक चमत्काराची आशा ठेवणे केवळ स्वतःला धोका आहे; एकाने समजून आणि प्रकृति च्या नियमा नुसार जगले पाहिजे. एकाद्यास आपल्या कृतीच्या बाबतीत सावधानता ठेवली पाहिजे, कारण हेच बियाणे पेरत आहे ज्याच्या गुणवत्तेनुसार गोड किंवा कडू फळ मिळेल.

कृतीचे तीन प्रकार असतातः शरीराचे,वाणीचे आणि मनाचे. कुणीही आपल्या स्वतःस अवलोकन करण्यास शिकतो तेव्हा त्याला लवकरच कळून येते की मनाची कृतीच महत्वाची आहे, कारण हेच ते बीज आहे जे ह्या कृतीचे फळ देते. वाचिक आणि शारीरिक क्रिया केवळ मनाच्या कृतीचे बाह्य प्रक्षेपण,एक तीव्रता मोजण्याचे प्रमाण आहे. त्या क्रियांचा मनाच्या कृतीमध्ये प्रारंभ होतो आणि तीच मानसिक कृती नंतर वाणी किंवा शारीरिक स्तरावर प्रकट होते. म्हणूनच बुध्दाने घोषित केले कीः

सर्व कृतीच्या आधी मन आहे,
मन सर्वात जास्त महत्वाचे आहे, सर्व काही मनामध्ये तयार होते.
अशुद्ध मन असेल तर,
आपण जे बोलत आहात किंवा कृती करत आहात,
तर दुःख आपल्या मागे लागते
जसे एका गाड़ीचे चाक जोतलेल्या जनावराच्या पाया मागे धावते.

जर शुध्द मनाने
आपण बोललात किंवा कृती केली,
तर सौख्य आपल्या मागे येईल
एका छाये प्रमाणे जी कधीही सोडून जाणार नाही.

जर अशी गोष्ट असेल तर,तर एकास समजले पाहिजे की मन म्हणजे काय आणि ते कसे काम करते. आपण अभ्यासाद्वारे ह्या तथ्याचा शोध घेणे चालू केले आहे. जसजसे आपण पुढे जाऊ,तेव्हा आपल्यास स्पष्ट होईल की मनाचे चार प्रमुख खंड किंवा aggregates(संग्रह) आहेत.

पहिल्या खंडास म्हटले जाते viññāṇa(विज्ञान),ज्याला जाणीव(चेतना) असे संबोधले जाते. जोपर्यंत जाणीवेच्या संपर्कात येत नाहीत तोपर्यंत जाणीव असणारी इंद्रिये निर्जीव असतात . उदाहरणासाठी, जर एकादा बघण्यामध्ये(दृष्टी) तल्लीन असेल,आणि आवाज येत असेल तर तो त्याला ऐकू येणार नाही,कारण की सर्व चेतना डोळ्या मध्ये एकवटलेली असेल.मनाचा हा भाग कोणताही भेदभाव न करता ओळखण्याचे, फक्त समजण्याचे काम करण्यासाठी आहे, जेव्हा ध्वनि कानाच्या संपर्कात येतो, तेव्हाviññāṇa(विज्ञान) केवळ एक ध्वनि येत आहे असे ओळखतो.

तेव्हा मनाचा पुढील हिस्सा काम करणे सुरु करतोः saññā(संज्ञा) बोध आहे. एक ध्वनि येतो,आणि कोणाच्याही पुर्वानुभव आणि आठवणीने,एकादा त्यास ओळखतोः एक ध्वनि ... शब्द ... प्रशंसा चे शब्द ... चांगले; नाही तर, एक ध्वनि ... शब्द ... शिवीचे शब्द ... वाईट. त्या नंतर आपल्या जुन्या अनुभवा अनुसार, चांगला किंवा वाईट असे तो मूल्यांकन करतो.

लगेच मनाचा तिसरा भाग आपले काम सुरु करतोःvedanā(वेदना), संवेदना. एकादा ध्वनी येताक्षणीच, शरीरावर संवेदना उत्पन्न होते,परंतू ह्या अनुभुतीस ओळखते आणि मुल्यांकन करते,अनुभूतीच्या मुल्यांकानुसार सुखद किंवा दुःखद ठरवली जाते. उदाहरणार्थः एक ध्वनि आला आहे ….शब्द…प्रशंसेचे शब्द … चांगले आहेत –आणि पुर्ण शरीरभर सुखद अनुभूती जाणवतात. नाही तर; एक ध्वनि आला आहे … शब्द … शिव्यांचे शब्द … वाईट –- आणि कुणालाही पूर्ण शरीरावर अप्रिय संवेदनेची अनुभूती जाणवेल. संवेदना शरीरावर उत्पन्न होतात, आणि मनास त्या जाणवतात; ह्या कार्यास vedanā(वेदना) संवेदना म्हटले जाते.

त्या नंतर मनाचा चौथा खंड आपले काम सुरु करतोः sahkara(संस्कार) प्रतिक्रिया. एक आवाज येतो … शब्द … प्रशंसेचे शब्द … चांगले … सुखद अनुभूती –आणि त्याला ती आवडतेः “ही प्रशंसा आश्चर्यजनक आहे मला आणखी पाहिजे!” नाहीतरः एक आवाज येतो … शब्द … शिवीचा शब्द … वाईट … अप्रिय संवेदना - आणि त्या बद्दल आपली नापसंती सुरु होतेः “ह्या शिव्या मी सहन करु शकत नाही,त्या बंद करा!” इंद्रियाच्या प्रत्येक दरवाजा मध्ये, त्याच प्रकारची प्रतिक्रिया होते, डोळे,नाक,जीभ, शरीर. ह्या प्रकारे जेव्हा एक विचार किंवा कल्पना मनाच्या संपर्कात येते, तेव्हा तशा प्रकारच्याच संवेदना शरीरावर उत्पन्न होतात, सुखद किंवा दुखःद, आणि आम्ही पसंती किंवा नापसंतीच्या प्रतिक्रिया सुरु करतो. ही क्षणिक पसंती मोठ्या आसक्ति मध्ये बदलून जाते; ही नापसंती मोठ्या द्वेषा मध्ये बदलून जाते. एकजण आपल्या अंतर्मनात गांठी बांधणे सुरु करतो.

saṅkhārā(संस्कार) मानसिक प्रतिक्रियाःहेच खरे बीज आहे जे फळ देते,कृती जी परिणाम देते. प्रत्येक क्षणी एकजण अशी बी पेरीत असतो, पसंती किंवा नापसंतीचे, राग(आसक्ति) किंवा द्वेषाची प्रतिक्रिया करत रहातो, आणि असे करण्यामुळे आपल्यास दुःखी करत रहातो.

काही प्रतिक्रिया पुष्कळच कमी ठसा उमटवतात, आणि जवळजवळ लगेच नाश पावतात,ज्या काही थोडा खोल ठसा उमटवतात त्या काही काळानंतर नाश पावतात, आणि ज्या काही खोलवर ठसा उमटवतात त्या काही पुष्कळ काळ लोटल्यावर नाश पावतात. एका दिवसाच्या शेवटी,जेव्हा कुणीही उत्पन्न केलेल्या सर्व saṅkhārā(संस्कार)ना आठवण्याचा प्रयत्न केला, तर दिवसभर केलेल्या संखारापैकी ज्यांनी पुष्कळच खोलवर ठसा सोडला आहे अशा एक किंवा दोनच आठवतील . त्याच प्रमाणे एका महिन्याच्या शेवटी किंवा एका वर्षाच्या शेवटी ज्यानी त्या कालावधीत पुष्कळच खोलवर ठसा उमटवला आहे अशा एक किंवा दोनच saṅkhārā(संस्कार) आठवतील आणि आवडो किंवा न आवडो, ज्या काही saṅkhārā(संस्कार) संस्कारानी मनावर मजबूत ठसा उमटवला आहे त्या जीवनाच्या अंतीम क्षणी उदभवणे स्वाभाविक आहे; आणि मनाच्या त्याच अंतीम क्षणाच्या प्रकृतीच्या स्वभावानुसार मधूर किंवा कटु गुणांनी भरलेले पुढील जीवन सुरु होईल. आपण स्वतःच आपल्या कृतीप्रमाणे भविष्य घडवीत असतो.

विपश्यना मरण्याची कला शिकवतेःशांति पुर्वक समतोल पणे कसे मरावे. आणि एकजण जीवन जगण्याची कला शिकून मरण्याची कला शिकतोःवर्तमान क्षणावर स्वामीत्व कसे मिळवावे, ह्या क्षणी कसेsaṅkhārā(संस्कार) उत्पन्न न व्हावे,कसे येथे आता सुखी जीवन जगावे. जर वर्तमान चांगला असेल,तर जी केवळ वर्तमानाची संतान आहे अशा भविष्याची चिंता करु नका,आणि म्हणूनच भविष्य चांगला असणे स्वाभाविक आहे.

येथे ह्या तंत्राचे दोन पैलू आहेतः

प्रथम मनाच्या चेतन आणि अचेतन दरम्यान असणारी भिंत तुटू लागते. सर्वसाधारण पणे अचेतन मन कोणता अनुभव घेत आहे त्याच्या बद्दल चेतन मनास काहीही माहिती नसते. ह्या अज्ञाना मुळे लपलेल्या, प्रतिक्रिया अचेतन स्तरावर होत रहातात; काही काळाने चेतन स्तरावर पोहोचतात, तोपर्यंत त्या इतक्या तीव्र होतात कि त्या सहजपणे मनावर काबू मिळवितात. ह्या तंत्रा द्वारे, मनाचा संपूर्ण पुंज सचेत,सजग होतो; अज्ञानाला दूर केले जाते.

तंत्राचा दुसरा पैलू समता हा आहे.एकास प्रत्येक संवेदनेच्या अनुभवाची माहिती होत रहाते, परंतू प्रतिक्रिया करत नाही, राग आणि द्वेष् यांच्या नवीन गांठी बांधत नाही,आणि आपल्यासाठी दुःख उत्पन्न करीत नाही.

सुरु करताना, जेव्हा आपण ध्यानासाठी बसाल, तेव्हा आपला पुष्कळसा वेळ संवेदने प्रती पतिक्रिया करण्यामध्ये जाईल, परंतू काही क्षण तीव्र वेदना असून सुध्दा आपण समते मध्ये असाल. हे असे क्षण मनाच्या संवयीची तऱ्हा बदलण्यासाठी पुष्कळच शक्तिशाली आहेत. हळू हळू आपण अशा स्थिती पर्यंत पोहोचाल की ज्यामध्ये आपण कोणत्याही संवेदनेवर aniccā(अनिक्क/अनिच्च), ही(संवेदना) समाप्त होणारी आहे असे ओळखून मंद स्मित कराल.

ही अवस्था प्राप्त करण्यासाठी, आपल्याला स्वतःच काम केले पाहिजे, दुसरा कुणीही आपल्यासाठी हे काम करु शकणार नाही. आपण ह्या मार्गावर पहिले पाऊल टाकले हे चांगले झाले आहे;आता एक एक पाऊल आपल्या स्वतःच्या मुक्तिच्या दिशेने चालत रहा .

आपणा सर्वास खऱ्या सुखाचा आनंद मिळो.

सर्व प्राणी सुखी होवोत!