आठव्या दिवसाचे प्रवचन

गुणाकाराचा नियम आणि त्याच्या उलट,निर्मूलनाचा नियम---समता सर्वात मोठे कल्याणकारी—समता एखाद्यास सत्य कर्माचे जीवन जगण्यासाठी सक्षम करतो – समतेमध्ये रहाण्यामुळे एकजण आपल्यासाठी एक सुखी भविष्य सुनिश्चित करतो.

आठ दिवस समाप्त झाले; आपणास काम करण्यासाठी आता दोन दिवस बाकी आहेत. राहिलेल्या दिवसामध्ये आपण विद्येस चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे असे बघा, म्हणजे आपण ह्याचा योग्य प्रकारे उपयोग करु शकाल आणि आपल्या दैनिक जीवनामध्ये ह्याचा उपयोग करु शकाल. धम्म काय आहे हे समजून घ्याः निसर्ग,सत्य,विश्वव्यापी नियम

एका बाजूस सतत गुणाकार करण्याची एक प्रक्रिया आहे. दुसऱ्या बाजूस तेथे नष्ट होण्याची प्रक्रिया आहे. हे चांगल्या प्रकारे काही शब्दातच समजावून सांगितले गेले होतेः

वास्तवामध्ये नश्वरता हा स्थिती विषय आहे,
स्वभावतः उत्पन्न होणारी आणि नष्ट होणारी.
जर त्या उत्पन्न झाल्या आणि विझविल्या गेल्या,
तर त्यांचे निर्मूलन खरे सुख आणतात.

प्रत्येक मानसिक स्थिती, प्रत्येक (saṅkhārā) संस्कार अनित्य आहे, उत्पन्न आणि नष्ट होणारा स्वभाव आहे. हा नष्ट होतो,परंतु पुढल्याच क्षणी पुन्हा पुन्हा उत्पन्न होतो; अशा प्रकारे (saṅkhārā) संस्काराची वाढ होत राहते. जर कुणी ज्ञान वाढवितो आणि नंतर वास्तविकतेने अवलोकन करणे सुरु करतो,तेव्हा वाढत रहाण्याची प्रक्रिया बंद होते आणि निर्मूलनाची प्रक्रिया सुरु होते. एक (saṅkhārā) संस्कार वर येतो,परंतु साधक समतेमध्ये रहातो; संस्काराची सारी शक्ती कमी कमी होत जाते आणि नंतर तो नष्ट होऊन जातो. जुन्या (saṅkhārā) संस्काराचे थरा वर थर वरवर येतात आणि एकाने समता ठेवल्यास ते नष्ट होऊन जातात. जितके (saṅkhārā) संस्कार नष्ट होतील,तितकेच सुख त्यास प्राप्त होईल,दुःखमुक्तिचे सुख. जेव्हा जुने सर्व (saṅkhārā) संस्कार नष्ट होतील,तेव्हा त्याला पूर्ण मुक्तीच्या अपरिमित सुखाचा आनंद प्राप्त होईल.

मनाची जुनी संवय प्रतिक्रिया करण्याची आहे,आणि प्रतिक्रियामध्ये वाढ करण्याची आहे. काही नको असलेले घडते, आणि एखादा द्वेषा(घृणा)चा (saṅkhārā) संस्कार निर्माण करतो. (saṅkhārā) संस्कार मनामध्ये उठताक्षणीच, एक अप्रिय शारीरिक संवेदना त्या बरोबरच येते. पुढल्याच क्षणी प्रतिक्रिया करण्याच्या जुन्या संवयीनुसार तो पुन्हा द्वेष उत्पन्न करतो, जे वास्तवामध्ये अप्रिय शारीरिक संवेदनेमुळेच होते. क्रोधाची बाह्य प्रेरणा ही अप्रत्यक्ष आहे; वास्तवामध्ये प्रतिक्रिया आपल्यामध्ये होत असलेल्या संवेदने बद्दल असते. अप्रिय संवेदना एकाद्याच्या द्वेषाचे कारण बनते, जे एक आणखी एका अप्रिय संवेदनेला जन्म देते, जे पुन्हा एकदा त्यास प्रतिक्रिया करण्यासाठी कारण बनते, ह्या प्रकारे, वाढत रहाण्याची प्रक्रिया सुरु होते.जर एकजण संवेदनेवर प्रतिक्रिया न करता त्याऐवजी त्याच्या अनित्य स्वभावाला समजून स्मित करतो, तेव्हा तो नव्या संखार(संस्कार)ला उत्पन्न करीत नाही, आणि (saṅkhārā) संस्कार, जो आधीच उत्पन्न झाला आहे त्याला वाढू न दिल्याने तो नष्ट होऊन जातो. पुढल्याच क्षणामध्ये, एक आणखी त्याच पकारचा (saṅkhārā) मनाच्या खोलवरुन संस्कार उत्पन्न होईल; एकजण समते मध्ये रहातो,तेव्हा तो देखील नष्ट होऊन जाईल. पुढच्याच क्षणी एक आणखी उत्पन्न होईल; जेव्हा एकजण समते मध्ये रहातो, तेव्हा तो देखील नष्ट होईल. नष्ट होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

एखादा आपल्या मध्ये होत असलेल्या प्रक्रियेस पहातो त्या संपुर्ण जगामध्ये सुध्दा होत असतात.उदाहरणार्थ, कुणी एकाने वडाच्या झाडाचे बी पेरले. त्या छोट्याशा बी पासून एक विशाल वृक्ष तयार होतो, जो वर्षानुवर्षे जिवंत असेपर्यंत असंख्य फळे देतो. आणि त्यानंतर तो मृत झाला तरी ही प्रक्रिया सुरुच रहाते, कारण की त्या वृक्षाच्या प्रत्येक फळामध्ये एक किंवा अनेक बिया, त्यामध्ये तीच गुणवत्ता असेल ज्या बी पासून तो मूळ वृक्ष उत्पन्न झाला होता. जेव्हा ह्या बियांमधून एक बी सुपिक जमीनीवर पडते तेव्हा ती उगवते आणि दुसऱ्या वृक्षामध्ये रुपांतरीत होते जो हजारो फळे देतो ज्यामध्ये त्याच प्रकारचे बी असते. फळ आणि बी, बी आंणि फळ, वाढत रहाण्याची ही एक अंतहीन प्रक्रिया आहे. त्याच प्रकारे अज्ञानामुळे एकजण (saṅkhārā) संस्काराचे बी टाकतो. जे आता किंवा नंतर एक फळ देते,ज्याला म्हटले जाते (saṅkhārā) संस्कार, आणि ह्यामध्ये सुध्दा अगदी त्याच प्रकारचे एक बी असते. जर कुणी ह्या बीजाला सुपीक जमीनी वर टाकले तर एक नवीन (saṅkhārā) संस्कारामध्ये अंकुरित होते, आणि एकाचे दुःख वाढत जाते, तथापि,जर कुणी खडकाळ जमिनी वर बीज टाकले, तर त्याला अंकुर फुटू शकणार नाही; त्यापासून काहीच उत्पन्न होणार नाही. वाढत रहाण्याची प्रक्रिया बंद होऊन जाईल,आणि आपोआपच उलटी,निर्मुलनाची प्रक्रिया सुरु होईल.

समजून घेऊया की ही प्रक्रिया कशी काम करते. हे समजावून सांगितले गेले होते की जीवन प्रवाह, मन व शरीराचा प्रवाह सुरू राहण्यासाठी काही इनपुट आवश्यक असते. शरीरासाठी जे भोजन कुणीएक खातो ते इनपुट असते, त्याच बरोबर वातावरण ज्यामध्ये तो रहात असतो तेही. जर एक दिवस कुणी खाल्ले नाही तरीसुद्धा त्याच्या शरीराचा प्रवाह लगेच थांबणार नाही. आपल्या शरीराच्या आंत असलेल्या जुन्या संचयित ऊर्जेचा वापर करुन तो सुरूच राहतो.जेव्हा सर्व संग्रहित ऊर्जा संपून जाते, त्यानंतरच प्रवाह थांबतो, शरीर मरण पावते. शरीराला एका दिवसामध्ये केवळ दोन किंवा तीन वेळाच भोजनाची आवश्यकता असते, परंतु मनाच्या प्रवाहाला मात्र प्रत्येकक्षणी इनपुट ची आवश्यकता असते. मानसिक इनपुट म्हणजे saṅkhārā संस्कार हे आहेत. प्रत्येक क्षणी एकजण saṅkhārāसंस्कार चे इनपूट देतो,आणि चेतनेचा प्रवाह सुरू राहतो. जर एखाद्या क्षणी कुणीही नवीन saṅkhārāसंस्कार उत्पन्न केला नाही तर प्रवाह लगेचच बंद होणार नाही; त्याऐवजी तो जुन्या संग्रहित saṅkhārā(संस्कार) मधून ऊर्जा घेईल. एका जुन्या saṅkhārā(संस्कार)स त्याचे फळ देण्यासाठी भाग पाडले जाईल, म्हणजेच प्रवाह सुरू रहाण्यासाठी तो मनाच्या वरच्या स्तरावर येईल; आणि शारीरिक संवेदनेच्या रूपामध्ये प्रकट होईल. जर कुणी संवेदनेप्रति प्रतिक्रिया केली, तर पुन्हा एकजण नवीन saṅkhārā संस्कार तयार करणे सुरू करतो, दुःखाचे नवीन बी पेरतो. परंतु जर कुणी एक तटस्थपणे संवेदना पाहतअसेल तर saṅkhārā(संस्कार)आपली शक्ती घालवितो आणि नष्ट होऊन जातो. पुढल्याच क्षणी एक आणखी जुन्या संखारा(संस्कार) ला मानसिक प्रवाह सुरू ठेवण्यासाठी वर यावे लागेल. पुन्हा एखाद्याने प्रतिक्रिया केली नाही तर तो सुद्धा पुन्हा नष्ट होऊन जाईल. जोपर्यंत कुणी एक सजगता आणि समता ठेवून असतो,  तोपर्यंत जुन्या  saṅkhārā संस्काराचे थरावर थर वरच्या स्तरावर येतात आणि नष्ट होऊन जातात; हा निसर्गाचा नियम आहे.

एखाद्याने तंत्राचा(विद्येचा) अभ्यास करुन ह्या प्रक्रियेचा स्वतःच अनुभव घेतला पाहिजे. जेव्हा एकजण आपल्या जुन्या संवयीचे, जुन्या दुःखाचे निवारण झाले आहे हे पहातो, तेव्हा तो समजतो की निर्मूलनाची प्रक्रिया काम करत आहे.

एक अनुरुप तंत्र आधुनिक धातू विज्ञानामध्ये उपलब्ध आहे. काही धातूंना साफ,उच्चतम शुध्द करण्यासाठी, दहा कोटी अणुंमधूनही अन्य जातीच्या एका अणुलादेखील दूर करण्याची आवश्यकता असते. हे दंडाच्या आकारामध्ये धातुला ओतून केले जाते, आणि नंतर आवश्यकप्रमाणे शुध्द केलेल्या त्याच साफ धातुचे एक गोल कडे बनवितात.हेच गोल कडे दंडाच्या(रॉड) व्रर फिरविले जाते,आणि चुंबकत्व उत्पन्न करते जे दंडाच्या शेवटील टोकापर्यंत कोणत्याही दुषिततेस घेऊन जाते. ह्याच वेळेस, धातुच्या दंडामधील सर्व अणुना पंक्तिबध्द करतो; तो लवचिक,नरम आणि त्यावर काम करण्यायोग्य बनतो. ह्याच प्रकारे, विपश्यना चे तंत्र(विद्या) शारीरिक रचनेवर शुध्द सजगतेचे गोल कडे फिरविल्यासारखे समजले जाऊ शकते, त्याच प्रकारच्या फायद्यासाठी कोणतिही दुषितता काढून टाकते.

सजगता आणि समता यामुळे मनाचे शुध्दिकरण होईल. ह्या मार्गावर एखाद्यास काहीही अनुभव येवो, प्रिय किंवा अप्रिय,ह्याला कोणतेही महत्व नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की आसक्ति किंवा द्वेष यांची प्रतिक्रिया न करण्याची,कारण हे दोन्ही दुःखाखेरीज दुसरे काहीही उत्पन्न करणार नाहीत. ह्या मार्गावरील प्रगती मोजण्याचा एकच मापदंड आहे तो म्हणजे समता किती आहे हा आहे. जर कुणास मनाच्या खोलवर जाऊन दुषितता घालवायची असेल तर शारिरीक संवेदनेच्या स्तरावर ती जोडली असली पाहिजे. जेव्हा कुणी संवेदनेस जाणण्यास शिकतो आणि त्याप्रति समता ठेवतो, तेव्हा बाहेरील परिस्थितीमध्ये देखील चांगल्या प्रकारे संतुलन ठेवणे त्याला सोपे होऊन जाते.

बुध्दाना एकदा विचारले गेले होते की खरे कल्याण काय आहे. त्यांनी सांगितले की उच्चतम कल्याण जीवनांतील सर्व दैवघटित फेरबदल,उतार चढाव,असूनसुध्दा एखाद्याची मनाचे संतुलन ठेवण्याची क्षमता किती आहे ह्यामध्ये आहे. एखाद्यास सुखद किंवा दुःखद परिस्थिती,जीत किंवा हार, फायदा किंवा नुकसान,चांगल्या किंवा वाईट नावाला सामोरे जाऊ लागू शकते; प्रत्येकासच ह्या सर्वाना तोंड द्यावे लागू शकते. परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये, काय कुणी आपल्या हृदयापासून खरे स्मित करु शकतो? जर एखाद्याला मनामध्ये खोलवर समता आली असेल,तर तो खरा सुखी आहे.

जर ही समता वरवरची असेल तर त्याचा दैनिक जीवनामध्ये उपयोग होणार नाही. जणू प्रत्येक व्यक्ति पेट्रोलची टाकी,किंवा गॅसोलिन आपल्याबरोबर घेऊन चालला आहे. जर एक ठिणगी पडली तर, जुन्या प्रतिक्रियेचे फळ म्हणून, लगेच लाखो अधिक ठिणग्या उत्पन्न होऊन एक मोठा विस्फोट होतो, अधिक saṅkhārā(संस्कार),जे आणखी अधिक आग,भविष्यामध्ये अधिक दुःख आणतील. विपश्यनेच्या अभ्यासामुळे,एकजण आपली टांकी हळूहळू रिकामी करतो. आतासुध्दा जुन्या saṅkhārā(संस्कार) च्या कारणामुळे ठिणग्या येतात,परंतु जेव्हा त्या येतात तेव्हा त्या केवळ आपल्या बरोबर आणलेले इंधनच जाळतात; त्यांना कुठलेही नवीन इंधन दिले जात नाही. जोपर्यंत त्यांनी बरोबर आणलेले इंधन संपत नाही तोवर त्या संक्षेपामध्ये जळत रहातात,आणि त्यानंतर त्या विझून जातात. ह्या नंतर, जेव्हा एकजण ह्या मार्गावर पुढे जातो, स्वाभाविकपणे प्रेम व करुणा यांचे थंड पाणी निर्माण करणे सुरु करतो, आणि टाकी ह्या पाण्याने भरुन जाते. आता, जशी एक ठिणगी येते,ती विझून जाते. येथपर्यंत की त्यामधील अल्पसे इंधन देखील जळू शकत नाही.

एकजण बौध्दिक स्तरावर ह्या गोष्टी समजू शकतो, आणि हे देखील जाणतो की आग सुरु झाल्यास एक पाण्याचा पंप तयार ठेवायला हवा. परंतु खरोखरच जेव्हा आग लागते तेव्हा तो पेट्रोल पंप चालू करतो आणि मोठी आग(वणवा) सुरु होते. त्यानंतर केलेल्या चुकीची जाणीव होते, परंतु तरीही पुन्हा आग लागल्यावर हीच चूक पुन्हा करतो, कारण की त्याचे ज्ञान केवळ वरवरचे असते. जर कुणास मनाच्या खोलवर खरे ज्ञान असेल तर अशी व्यक्ति आगीला सामोरे जावे लागल्यास केवळ नुकसानच होईल हे समजून त्यावर पेट्रोल टाकणार नाही. त्याऐवजी एकजण दुसऱ्याना व आपल्याला मदत व्हावी म्हणून प्रेम व करुणेचे थंड पाणी टाकेल.

ज्ञान हे संवेदनेच्या स्तरावर असले पाहिजे. जर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये संवेदनेस जाणणे व त्याप्रति समता ठेवणे ह्यामध्ये प्रशिक्षित झालात, तर कुणीही आपल्यास चीत करु शकणार नाही. कदाचित काही क्षणापुरतेच आपण कोणतिही प्रतिक्रिया न करता निरिक्षण केले. त्यानंतर,ह्या संतुलित मनाने काय कृत्य करावे ह्याचा आपण निर्णय घेता. हा एक संतुलित मनाने निर्णय घेतला जात असल्यामुळे हे कृत्य सकारात्मक, दुसऱ्याना उपयोगी असणे स्वाभाविक आहे.

कधी कधी जीवनामध्ये कडक कारवाई करण्याची आवश्यकता पडते. एखाद्याने स्मितहास्य करीत विनम्रतेने हळूवारपणे समजावण्याचा प्रयत्न केला,परंतु ती व्यक्ति केवळ कठोर शब्द,कठोर कृत्याद्वारेच समजू शकते. अशावेळेस एकास कठोर शब्द किंवा शारीरिक कृत्याचा वापर करावा लागतो. परंतु असे करण्यापूर्वी, कुणिही स्वतःचे परिक्षण करावे की आपले मन संतुलित आहे का आणि त्या व्यक्तिसाठी फक्त प्रेम व करुणाच आहे. जर हो असेल तर त्या कारवाईचा उपयोग होईल; जर नसेल तर, त्यामुळे मदत मिळू शकणार नाही.एकास चुका करणाऱ्या व्यक्तिस मदत मिळावी म्हणून कठोर कारवाई करावी लागते. प्रेम व करुणेच्या ह्या आधारावर कुणिही चुकीचे ठरणार नाही.

आक्रमकतेच्या एका उदाहरणाच्या बाबतीत, एक विपश्यना साधक हल्ला करणाऱ्या आणि पीडित यांना वेगळे करताना, फक्त पीडितासाठीच नव्हे तर हल्ला करणाऱ्या प्रतिसुध्दा करुणेनेच काम करतो. त्याला हे समजते की हल्लेखोर स्वतःच नुकसान कसे करुन घेत आहे ह्याचा त्याला पत्ताच नाही. हे समजल्यानंतर,एकजण त्याला भविष्यामध्ये दुःखास कारणीभूत होणाऱ्या कृत्यापासून थांबवून त्या व्यक्तिला मदत करण्याचा प्रयत्न करतो.

तथापि,आपण केवळ घटनेनंतर आपल्या कारवाईचे समर्थन न करण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. आपण ह्या कृत्याआधी मनाचे परिक्षण करा. जर मन दुषिततेने भरले असेल,तर एकजण कुणालाही मदत करु शकत नाही. दुसऱ्यांचे दोष सुधारण्याच्या प्रयत्नापूर्वी प्रथम एकास आपले दोष सुधारावे लागतील.सर्वात आधी आपले स्वतःचे निरिक्षण करुन स्वतःचे मन शुध्द केले पाहिजे. त्यानंतरच आपण पुष्कळाना मदत करु शकाल.

बुध्दांनी सांगितले की जगामध्ये चार प्रकारचे लोक असतातः जे काही अंधकारापासून अंधाराकडे धावत असतात,जे काही प्रकाशाकडून अंधाराकडे धावत असतात,जे काही अंधाराकडून प्रकाशाकडे धावत असतात,आणि जे काही प्रकाशाकडून प्रकाशाकडे धावत असतात.

पहिल्या प्रकारांतील एका व्यक्तिसाठी, तेथे सर्वत्रच दुःख,अंधार आहे, परंतु त्याचे सर्वांत मोठे दुर्भाग्य हे आहे की त्याच्यापाशी ज्ञानसुध्दा नाही. प्रत्येक वेळी त्याला जेव्हा कोणत्याही दुःखाला तोंड द्यावे लागते तेव्हा त्याच्यामध्ये अधिकच क्रोध,अधिकच घृणा,अधिकच द्वेष उत्पन्न होतो आणि त्याच्या दुःखासाठी दुसऱ्याना दोष देतो. हे सर्व क्रोध आणि द्वेषाचे saṅkhārā (संस्कार)  भविष्यामध्ये त्याला केवळ अधिकच अंधार, आणखी अधिक दुःख आणतील.

दुसऱ्या प्रकारातील एक व्यक्तिला जगामध्ये प्रकाशमान म्हटले जातेः पैसा,स्थान,सामर्थ्य, परंतु त्यालासुध्दा ज्ञान नाही. अज्ञानामुळे तो अहंकाराची वाढ करतो, हे न समजता की अहंकाराच्या ताणामुळे त्याला भविष्यामध्ये फक्त अंधारच येईल.

तिसऱ्या प्रकारातील एका व्यक्तिची स्थितीसुध्दा पहिल्या प्रकारातील व्यक्ति सारखीच आहे,अंधाराने वेढलेला; परंतु त्याला ज्ञान आहे,आणि परिस्थितीला समजतो. आपल्या दुःखास शेवटी आपणच जबाबदार आहोत हे जाणून घेत, तो शांत चित्ताने व शांतिपूर्वक ही स्थिती बदलण्यासाठी जे काही करावे लागू शकते ते करतो,परंतु दुसऱ्यांप्रति कोणत्याही क्रोध किंवा घृणेशिवाय हे करतो; त्याऐवजी त्याला नुकसान पोहोचविणाऱ्या प्रति केवळ प्रेम आणि करुणा असते. आपल्या भविष्यासाठी तो प्रकाशच प्रकाश तयार करतो.

शेवटी चौथ्या प्रकारांतील व्यक्ति,दुसऱ्या सारखाच,एक,पैसा,स्थान आणि सामर्थ्य प्राप्त करतो, परंतु दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिच्या भिन्न,तो देखील ज्ञानाने परिपूर्ण आहे. तो स्वतःसाठी व त्यावर जे अवलंबून आहेत त्यांच्या निर्वाहासाठी जे काही त्याच्या जवळ आहे त्याचा उपयोग करतो,परंतु जे काही उरते त्याचा दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी तो उपयोग करतो, ते सुध्दा प्रेम आणि करुणे बरोबर. आता आणि भविष्यात देखील प्रकाशच प्रकाश.

आता अंधार किंवा प्रकाश यापैकी कुणाला तोंड दावे लागू शकेल याची निवड कुणीही करु शकत नाही; हे त्याच्या जुन्या saṅkhārā(संस्कार) द्वारेच निर्धारित केले जाते. भूतकाळ बदलता येत नाही, परंतु कुणीही आपल्यामध्ये स्वामीत्व करुन वर्तमानाचे नियंत्रण करु शकतो. भविष्य म्हणजेच केवळ भूतकाळ अधिक वर्तमान काळात जोडले गेलेले कर्म आहे. संवेदनेबद्दल सजगता आणि समता ठेवून स्वतः कसे स्वामी बनावे हे विपश्यना शिकविते. जर कुणी वर्तमान क्षणामध्ये ह्या स्वामित्वाचा विकास केला तर भविष्य आपोआपच उज्वल होईल.

वर्तमान क्षणाचा स्वामी होण्यासाठी, स्वतःच स्वामी कसे व्हावे हे समजण्यासाठी उरलेल्या दोन दिवसांचा उपयोग करा. सर्व दुःखातून बाहेर येण्यासाठी, व येथे आणि आता खऱ्या सुखाचा आनंद घेण्यासाठी धम्मामध्ये पुढे जात रहा.

सर्वांचे मंगल होवो!