ह्या परंपरेतील आचार्यांची श्रुंखला

गोयंकाजी आणि त्यांच्या सहाय्यक आचार्यांचे विपश्यना साधक अतिशय कृतज्ञतेने ह्या आचार्यांच्या शृंखलेचे मोठे ऋण मानतात, ज्यांनी गौतम बुद्ध यांच्यापासून, पिढ्या नि पिढ्या धम्माच्या ह्या अमूल्य रत्नाला त्याच्या प्राचिन शुद्धतेत सुरक्षित ठेवले आहे. जरी विपश्यनाचे हे शुद्ध तंत्र पुष्कळ शतकांपासून भिक्खू आचार्यांच्या वंशावळीने सुरक्षित ठेवले आहे, ज्यांची विशिष्ट नावे आपल्यासाठी अज्ञात असली तरी, आम्हाला आमच्या परंपरेतील सर्वात अर्वाचिन धम्माचार्य आणि ते महान भिक्कू विद्वान/आचार्य ज्यांनी ह्या परंपरेत त्यांना शिकविण्यासाठी अधिकृत केले आहे ते ज्ञात आहेत. ह्या विभागात आमच्या या परंपरेतल्या खालीलपैकी प्रत्येक आचार्यांचा थोडक्यात इतिहास आणि जीवनचरित्र दिले आहे:

सयाजी ऊ बा खिन

साया थेट

लेडी सयाडॉ