आचार्योंकी श्रृंखला

सयाजी ऊ बा खिन

1899-1971

विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारा The Sayagyi U Ba Khin Journal मधील खालील लेखातून काही अंश उध्दॄत केले गेले आहेत.

सयाजी उ बा खिन यांचा जन्म, बर्माची राजधानी रंगून येथे 6 मार्च, 1899 रोजी झाला.एका श्रमिक वर्गाच्या जिल्ह्यात रहाणाऱ्या एका विनम्र कुटुंबातील दोन मुलांमध्ये हे सर्वात लहान होते.  उल्लेखनीय क्षमतेने स्मृती नुसार धडे पाठ करीत, व पान न पान इंग्रजी व्याकरण शिकून पाठ करीत ते एक प्रतिभासंपन्न विद्यार्थी असल्याचे त्यांनी शाळेत सिद्ध केले,. 1917 मध्ये, ते हायस्कूलची अंतिम परीक्षा पास झाले.त्याचबरोबर त्यांनी सुवर्ण पदक जिंकून कॉलेजची शिष्यवृत्तीदेखील मिळविली. परंतु कौटुंबिक दबावामुळे त्याचे औपचारिक शिक्षण बंद करण्यास आणि पैसे कमावणे चालू करण्यास भाग पाडले. त्यांची पहिली नोकरी “सुर्य” नामक The Sun एका बर्मी वृत्तपत्रापासून झाली, परंतु काही कालानंतर त्यांनी ब्रह्मदेशाच्या महालेखापाल कार्यालयामध्ये लिपिक म्हणून काम करणे चालू केले. 1937 मध्ये, भारतापासून ब्रह्मदेश वेगळे झाले तेव्हा त्यांची प्रथम विशेष कार्यालय अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

एक जानेवारी, 1937 रोजी,पहिल्याप्रथम सयाजी यांनी ध्यान करण्याचा प्रयत्न केला. साया थेजी-एक श्रीमंत शेतकरी आणि ध्यान गुरु- यांचा एक शिष्य उ बा खिन यांच्याकडे नेहमी येत असे आणि आनापान ध्यानाबद्दल विस्ताराने सांगत असे. जेव्हा सयाजी यांनी ह्या साठी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना एकाग्रतेचा चांगला अनुभव आला, त्यामुळे ते इतके प्रभावित झाले की त्यांनी एक पूर्ण कोर्स करण्याचा निर्धार केला.एका आठवड्यानंतर, त्यांनी दहा दिवसांच्या रजेसाठी अर्ज दिला आणि साया थेजी यांच्या शिबीर केंद्रावर निघून गेले. त्याच रात्री, उ बा खिन आणि दुसरा एक बर्मी छात्र, जो लेडी सयाडॉ यांचा शिष्य होता, त्यानी साया थेजी पासून आनापानसाठी निर्देश प्राप्त केले. दोन्ही शिष्यांनी जलदगतीने प्रगती केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना विपश्यना दिली गेली. सयाजी यांनी पहिल्या दहा दिवसांच्या शिबीरामध्ये चांगली प्रगती केली. जेव्हा ते रंगून येथे येत असत तेव्हा वारंवारच्या दौऱ्या दरम्यान त्यांचे आचार्य साया थेजी यांना त्यांच्या केंद्रावर भेटत आणि आपला अभ्यास चालू ठेवीत.

सयाजी यांची शासकीय सेवा आणखी सव्वीस वर्षे चालू राहिली.ज्या दिवशी ब्रह्मदेश स्वतंत्र झाला त्या 4 जानेवारी, 1948 रोजी महालेखाकार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढील दोन दशके त्यांनी विविध शासकीय पदांवर काम केले,पुष्कळशा वेळी दोन किंवा अधिक विभाग प्रमुखासारख्या पदांवर एकाच वेळी काम केले. तीन वर्षे त्यांनी एकाच वेळेस तीन विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आणि, दुसऱ्या एका वेळी तर चार विभाग प्रमुख म्हणून एक वर्षभर काम केले. 1956 मध्ये राज्य कृषि पणन मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तेव्हा बर्मी सरकारने एक उच्च मानद,थ्रय सिथू (Thray Sithu) नामक एक पदवी देउन त्यांना गौरविण्यात आले. आयुष्यातील शेवटची चार वर्षे त्यानी ध्यान धारणा शिकविण्यास समर्पित केली. बाकीच्या वेळेस ध्यानाचे कौशल्य शासकीय सेवेबरोबरच व्यतित केले.

त्यांनी 1950 मध्ये महालेखाकार कार्यालयामध्ये विपश्यना असोसिएशनची स्थापना केली, जेथे सामान्य लोक मुख्यतः कार्यालयांतील कर्मचारी विपश्यना शिकण्यासाठी येत.1952 मध्ये, रंगून मधल्या प्रसिद्ध श्वेडागॉन पॅगोडाच्या उत्तरेस दोन मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र (I.M.C.) चालू केले. अनेक बर्मी आणि परदेशी विद्यार्थ्यांना सयाजी यांच्याकडून येथे ध्यान शिक्षण मिळण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.

सयाजी छठा संगयाना(सहावा सस्वर पाठ) ज्याला सहावे बौद्ध परिषद म्हणून ओळखले जाते आणि ज्याचे रंगूनमध्ये 1954-56 च्या दरम्यान आयोजन करण्यात आले होते, त्याच्या नियोजनामध्ये सयाजी सक्रिय होते. 1950 मध्ये सयाजी दोन संघटना ज्यांचे ऊ.बा खिन हे संस्थापक सदस्य होते अशांचे नंतर बर्मा बुध्द सासना परिषदेचे संघ (U.B.S.C.),एक महान परिषदेसाठी नियोजन करणाऱ्या संस्थेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. ऊ बा खिन यांनी U.B.S.C. च्या एका कार्यकारी सदस्याच्या रुपात आणि पटिपत्ती (patipatti) समिति अध्यक्ष(ध्यानाचा अभ्यास) च्या रुपात आणि परिषदेचे मानद लेखा परिक्षक म्हणून सेवा दिली. तिथे 170 एकरावर व्यापक गृहनिर्माण प्रकल्प, जेवणाचे क्षेत्र आणि किचन, एक हॉस्पिटल, ग्रंथालय, संग्रहालय, चार वसतिगृहे, आणि प्रशासकीय इमारती होत्या. पुऱ्या उद्योगाचा केंद्रबिंदु महा पसनगुहा(महान गुंफा),हा विशाल हॉल आहे, जेथे बर्मा, श्रीलंका, थाईलैंड, भारत, कंबोडिया आणि लाओस येथून जवळजवळ पांच हजार भिक्षु , तिपिटक (बौद्ध धर्म ग्रंथ) ऐकणे, शुद्ध करणे, संपादित आणि प्रकाशित करण्यासाठी एकत्र झाले. एकत्रित काम करणाऱ्या भिक्षुंच्या समुहाने, पाली ग्रंथाचे प्रकाशन करण्यासाठी बर्मी, श्रीलंकन, थाई, आणि कंबोडियन प्रकाशनाची तुलना करुन आणि लंडन येथील पाली मजकूर सोसायटी रोमन-स्क्रिप्ट संस्करणची तुलना करीत तयार केले. दुरुस्त केले गेलेले आणि मंजूर केलेल्या ग्रंथाचे पठण महान गुंफे मध्ये झाले. दहा ते पंधरा हजार पुरुष आणि महिला भिक्षुंचे पठण ऐकण्यासाठी येत असत. सयाजी 1967 पर्यंत विभिन्न पदांवर UBSC मध्ये सक्रिय राहिले. अशा प्रकारे त्यांनी एक सामान्य गृहस्थ आणि त्याचबरोबर सरकारी अधिकारी ह्या स्वरुपात आपली जबाबदारी सांभाळीत मजबूत धम्म चा संकल्प घेऊन बुध्दाच्या उपदेशाचा प्रसार केला. ह्या शिवाय प्रमुख सार्वजनिक सेवेला प्राधान्य देत त्यांनी आपल्या केंद्रावर नियमितपणे विपश्यना शिकविणे चालु ठेवले. उल्लेखनीय कारकीर्द करुन सयाजी शेवटी शासकीय सेवे मधून 1967 मध्ये निवृत्त झाले. तेव्हा पासून जानेवारी, 1971 ला त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते I.M.C.मध्ये राहिले, व विपश्यना शिकवित राहिले.

त्यांचा प्राधान्यक्रम सरकारी कर्तव्याला असल्याने, सयाजी केवळ मोजक्या साधकांनाच शिकवू शकत. त्यांच्या बर्मी साधकापैकी अनेकजण त्यांच्या सरकारी कामाशी जोडले गेले होते. काही भारतीय साधकांचा गोयन्काजींनीच परिचय करुन दिला होता.पश्चिम देशांतून सहाव्या परिषदेसाठी काही लोक आले होते, त्यातील काही लोकांना ध्यानाच्या शिक्षणासाठी सयाजींकडे पाठविले गेले, कारण त्या वेळेस इंग्रजीमध्ये अस्खलित संभाषण करणारा दुसरा विपश्यना आचार्य नव्हता. सयाजी यांचे विदेशामधले साधक कमी असले तरी विविध प्रकाराचे होते, ज्यामध्ये प्रमुख पश्चिमी बौद्ध, विद्वान, आणि रंगून येथील राजनैतिक समुदायाचे सदस्य होते. वेळो वेळी, सयाजी यांना परदेशी प्रेक्षकांसाठी धम्म विषयावर संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले जात होते. ही व्याखाने पुस्तक रुपात प्रकाशित केली गेली आणि त्यात What Buddhism Isआणि The Real Values of True Buddhist Meditation (बौद्ध धर्म काय आहे) आणि (बौद्ध ध्यान ची वास्तविक मूल्ये) मध्ये समाविष्ट केली गेली.

गोयन्काजी भारतामध्ये एक शिबिर घेत असताना त्या वेळेस त्यांच्या आचार्यांच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळाली. त्या बदल्यात त्यांनी I.M.C. ला एक तार पाठविली ज्यामध्ये प्रसिध्द पाली कविता अंतर्भूत आहेः

अनिच्च वत संखारा,
उप्पादवय - धम्मिनो,
उप्पज्जित्वा निरुज्झन्ती,
तेसं वूपसमो सुखो ..

ह्या कवितेचा इंग्रजी अनुवाद आहे:

वास्तविकतः अस्थिरता ह्या संमिश्र गोष्टी आहेत,
स्वभावतःच उत्पन्न आणि नष्ट होणारी,
जर ती उत्पन्न झाली आणि विझवली गेली,
तर त्याचे निर्मूलन केल्यास आनंद मिळतो.

एक वर्षानंतर, त्यांच्या आचार्यांना एका श्रध्दांजली मध्ये गोयन्काजीने लिहिलेः " जरी त्यांना जाऊन एक वर्ष झाले असले तरी,शिबिरांच्या निरंतर सफलतेकडे पाहाताना, मी अधिक आणि अधिक आश्वस्त आहे की त्यांची मैत्रीच मला प्रेरणा देत आहे आणि पुष्कळ लोकांची सेवा करण्यासाठी ताकद देत आहे.... नक्कीच धम्माची शक्ति अमर्यादित आहे. सयाजींची इच्छा पूर्ण केली जात आहे, बुध्दाची शिकवण, ह्या सर्व शतकांमध्ये सुरक्षित ठेवली गेली आहे,आता देखील अभ्यास केला जातो, येथेच आणि आतादेखील चांगले परिणाम मिळत आहेत."

सयाजी ऊ बा खिन यांच्या बद्दल अतिरिक्त माहिती Pariyatti(परियत्ती)वर उपलब्ध आहे.